देहूरोड रेल्वे पूल धोकादायक

१२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


देहूरोड स्थानकातून रेल्वे गेल्यानंतर येथील पादचारी पुलास हादरे बसतात . त्यामुळे पुलाचे बांधकाम साहित्य निखळून पडू लागले आहे . हा पादचारी पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनला असून , त्याच्या दुरवस्थेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे ; मात्र हा पूल कोसळून काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . पुलाची दुरुस्ती न केल्यास दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही . इंग्रजांच्या काळात बांधकाम केलेला हा पूल साठ ते सत्तर वर्षे जुना आहे . त्यामुळे हा पूल खिळखिळा बनला असून , वाहतुकीसाठी आता धोकादायक ठरत आहे .

चिंचवड, तळेगाव येथील जुना पूल काढून नवीन पुलाचे बांधकाम केले आहे . मात्र , देहूरोड आणि खडकी येथील जुनेच पूल अद्यापही वापरात आहेत . पुलाच्या दुरवस्थेबद्दल स्टेशन मास्तरांनी एप्रिल महिन्यापासून ते अद्यापपर्यंत वरिष्ठ अभियंता विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे . मात्र , या विभागाकडून अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नसून , यासाठी आवश्यक फंड उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *