श्री क्षेत्र ओझर येथे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
०७ मार्च २०२२

ओझर


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पंचायत राजमंत्री श्री. कपिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मौजे ओझर नंबर एक येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ ओझरकर ग्रामस्थ ,पत्रकार बांधव ,विघ्नहर देवस्थानचे सर्व पदाधिकारी व सर्व राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न झाला. भूमिपूजन कार्यक्रमानंतर राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यां समवेत श्री विघ्नेहराचे दर्शन घेतले.नंतर विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व सर्व पदाधिकारी व ओझरकर ग्रामस्थांतर्फे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिलजी पाटील यांचा शाल, श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर विघ्नहर सांस्कृतिक भवन मध्ये पंचायत राज्यमंत्री कपिलजी पाटील ,आमदार अतुल बेनके,आशाताई बुचके ,प्रदीप कंद व ओझरच्या प्रथम नागरिक मथुरा ताई कवडे, राजश्री ताई, कवडे स्मिता ताई कवडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जवळपास पुणे जिल्ह्यातून अनेक महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत जिल्हा विकास यंत्रणा जि. प. पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील महिला स्वयंसहायता समूहातील व ग्राम संघातील महिलांचा जागतिक महिला मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता.

तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक महिलांना या ठिकाणी पंचायत राज्य मंत्री कपिलजी पाटील, आमदार अतुल बेनके व आशाताई बुचके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती, ओझरकर ग्रामस्थ व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *