पुणे वन विभागाची देहूरोड शितळा येथे अतिक्रमण विरोधी कारवाई
१२ नोव्हेंबर २०२२
देहूरोड कँटोनमेट बोर्डाच्या हद्दीतील शितळानगर येथे वनविभागाच्या जागेत केलेल्या अतिक्रमणांवर भांभुर्डे वन विभागाने कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य ताब्यात घेतले. शितळानगर देवी मंदिरा समोर वीट, माती, डबर विक्री व्यवसायावर कारवाई करण्यात आली. तसेच तेथे छोटे मोठे पत्रा टपरीवर देखिल कारवाई करण्यात आली. काही लोकांनी स्वतः हुन आपले अतिक्रमण हटवले. शितळादेवी मंदिरासमोर वीट माती डांबर बेकायदेशीरपणे वनविभागाच्या जागेवर टाकून व्यवसाय सुरु होता. या व्यवसायामुळे तेथील रहिवासी यांच्या घरावर धुळ, माती उडून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यामुळे अनेक लोकांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारींची दखल घेऊन भांबुर्डा वन विभागचे अधिकारी प्रदिप संकपाळ यांनी आपल्या विभागाचे सहा कर्मचाऱ्यांसह गुरुवारी शितळानगर देवी मंदिरासमोरील वन विभागाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एक जेसीबी, दोन ट्रक व साहित्य असे चार ते पाच लाख रुपये किमतीचे साहित्य वन विभागाने जप्त केले .
