राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर की विद्या चव्हाण?

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ सप्टेंबर २०२१

पुणे

राज्यातील महामंडळ वाटपाबाबत प्रक्रिया सुरू आहे. यातीलच महत्वाचे पद म्हणजे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आपल्या पारड्यात पडावे सासाठी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक असणाऱ्या विद्या चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर होणार होते… महिला आयोग अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर नवख्या रुपाली चाकणकर यांच्यावर प्रदेश महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी पडली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राज्यात जुन्नर तालुक्यातील शिवनेरी वरून शिव स्वराज्य यात्रेची सुरवात झाली. ही यात्रा सोलापूर येथे असतानाच चाकणकर यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी येऊन पडली. पहिलेच भाषण तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर होणार होते. पवार साहेबांनीच मनोधैर्य वाढवले आणि अतिशय आत्मविश्वासाने विविध उदाहरणे देत भाजपवर व भाजप नेत्यांवर आक्रमकतेणे भाषण करत त्यांच्या महिला अध्यक्ष पदाला सुरवात झाली. पुढे तीच आक्रमकता आजतागायत अगदी काल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याने आक्षेपहार्य केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आपली आक्रमकता कायम ठेवत त्यांचा राजकीय प्रवास सुरु आहे.

विद्या चव्हाण यांच्याबाबत बोलायचे झाले तर त्यांनी नेहमीच महिलांच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी आक्रमकतेने आवाज उठवला आहे. त्यांचा रजकीय प्रदीर्घ अनुभव व सुसंस्कृतपणा ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. सध्या सुरू असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणातील कळीचा मुद्दा बनला असून ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट करून हा मुद्दा तडीस नेला पाहिजे. एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यापेक्षा या मुद्द्याकडे सकारात्मकतेने विचार करून सोडवणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यालायला हवे असणारी सगळी कागदपत्रे एकत्रितपणे सादर करत मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत.

आता होणाऱ्या या महिला आयोग अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच चित्र स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *