वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चिखलीत कारवाई

१२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या वाहन चालविणे दोन चालकांना महागात पडले. चिखली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. अतुल बप्पासाहेब कुटे (वय २३, रा. दत्त कॉलनी,सद्‍गुरूनगर, भोसरी, मूळ-वडगाव, ता. गेवराई, जि. बीड) व सुरेश हनुमंत कलवले (वय २८, रा. सेक्टर क्रमांक एक, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुटे हा छोटा टेम्पो घेऊन तर कलवले हा बस घेऊन जात होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. छोटी चूकही जिवावर बेतते. तरीही अनेकजण वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालविताना दिसून येतात.

सिग्नल तोडणे, लेन कटिंग, विरुद्ध दिशेने जाणे यासह भरधाव वाहन चालविल्याने अपघात वाढत आहेत. अपघातात गंभीर जखमी होण्यासह जीव गमावणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. बेशिस्त चालकांवर कडक कारवाईची मागणी नेहमी होत असते. दरम्यान, चिखली पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. चिखली येथील स्पाईन रोडवरील कुदळवाडीतील मेन ब्रिजवर केलेल्या कारवाईत वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व इतर लोकांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *