पुणे | मेट्रोची उड्डाणपुलाची कामे सुरू असलेल्या रस्त्यांवर नो पार्किंग

०९ नोव्हेंबर २०२२

पुणे


शहरात ज्या रस्त्यांवर मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत, ते रस्ते नो-पार्किंग म्हणून जाहीर करावेत, तसेच नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास मोठ्या दंडाची कारवाई करावी, अशी विनंती पोलिस प्रशासनाला केल्याची माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. शहरातील रस्त्यांवर पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेने खड्डे दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, अनेक खड्डे उखडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी आहे. त्यातच शहरात मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या सर्व कारणांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएमआरडीए मेट्रोचे काम करणान्या ठेकेदार कंपनीसह महामेट्रो, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम करणा-या ठेकेदार कंपनीला नोटीस बजावून ज्या ठिकाणी कामे सुरू नाहीत तेथील बॉरकेडिंग काढण्याचे आदेश देण्यात आले.

दुसरीकडे प्रकल्पाची कामे सुरू असतानाही त्या रस्त्यावर व्यावसायिक व इतरांकडून वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मेट्रोची आणि उड्डाणपुलाची कामे सुरू असलेल्या रस्त्यांवर नो पार्किंग झोन जाहीर करण्याची वाहतूक पोलिसांना विनंती केली आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावणान्यांना मोठा दंड करण्याचेही सूचित केल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *