Junnar : बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन..नारायणगाव महाविद्यालयाचा पुढाकार

बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन

 

नारायणगाव : किरण वाजगे :- (कार्यकारी संपादक)
ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, पिंपरी चिंचवड पुणे येथील ग्लोबल रीसर्च कॉन्फरन्स फोरम आणि फरानाखोन राजाभट युनिव्हर्सिटी बँकॉक, थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने बॅंकॉक येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद घेण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सस्टेनेबल बिझनेस ग्रोथ, चॅलेंजेस, मेझर्स ॲन्ड सोल्यूशन्स इन ग्लोबल सिनेरिओ या विषयीच्या परिषदेत जगभरातील १३५ प्राध्यापक, उद्योजक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी थायलंडच्या पंतप्रधानांचे सल्लागार पिचाइ नरिप्थाफन, फरानाखोन राजाभट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रियांग कित्रातपोर्न, अमेरिकेतील ग्लोबल लीडर ल्युमिएरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मायली मुक्ता घोषाल, केरळ केंद्रीय विद्यापीठाचे डॉ.जे.गणेशकुमार, फरानाखोन विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. सुब्तारकुल सुचत, राजापार्क इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. वांथन्नापोल हिरुंबुराना, अरूणाचल प्रदेश मधील हिमालया विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रकाश दिवाकरन, फरानाखोन विद्यापीठाचे डॉ. अरुण चायनीत, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक व वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे वरिष्ठ संशोधक प्रा.डॉ.जे.पी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष मा.कृषीरत्न अनिल मेहेर व प्राचार्य डॉ.ए.बी. कुलकर्णी यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.


ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद यशस्वी करण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कार्यवाह रविंद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यावेळी पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ.डी.बी.भालके, डॉ.नितीन शेरजे, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसन्न देशमुख, सचिन पवार, हर्षा भोसले, रेशमा पठाण, सिद्धी आर्वीकर व इतर ७० प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रकाश दिवाकरन यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ.जे.पी भोसले यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *