कल्याण-नगर महामार्ग दुरुस्तीला आज मिळाला मुहूर्त : महामार्ग होणार सुसाट

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०९ नोव्हेंबर २०२२

आळेफाटा


यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कल्याण- नगर महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. या दुरुस्तीचे काम पावसामुळे रखडल्याने दिवाळीनंतर या दुरुस्तीला आळे येथून आज बुधवार दि.९ रोजी मुहूर्त मिळाला आहे. मढ ते अहमदनगर (नेप्ती नाका) इथपर्यंतचे सर्व पॅचवर्क करण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र सिंग ग्रुप चे मॅनेजर सतीश बागल यांनी दिली. तसेच कन्सल्टंट सोमेश्वर पाटील यांच्या देखरेखी खाली हे काम आजपासून सुरू झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती असेल की कल्याण-नगर महामार्गाला पेमदरा ते ओतूर दरम्यान शेकडो खड्डे पडल्याने खड्ड्यांबाबत आळे ग्रामस्थांनी देखील दि.१८ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे महामार्ग प्रशासनाला खडबडून जाग आली असून यासंबंधीची तात्काळ बैठक आळेफाटा पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या उपस्थित आळे ग्रामस्थ सोबत ठेकेदार जितेंद्र सिंग यांची शुक्रवार दि.१६ रोजी बैठक झाली. यामध्ये ठेकेदाराने ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले की दि.१५ ऑक्टोबर पर्यंत कायमस्वरूपी बुजवले जातील.पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थ आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी तूर्तास आंदोलन करण्यास स्थगिती दिली होती. परंतु पाऊस सुरू असल्याने हे काम रखडले होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *