जुन्नर तालुक्यात तात्काळ १ हजार अँटीजेन किट्स उपलब्ध करून देणार – दिलीप वळसे पाटील

नारायणगाव येथे covid-19 उपाय योजना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, आमदार अतुल बेनके, एस.पी संदीप पाटील यांची उपस्थिती

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यात तात्काळ १ हजार अँटीजेन किट्स उपलब्ध करून देणार अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी आज दिली.

दिवसेंदिवस कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना यावर उपाययोजना करण्यासाठी नारायणगाव येथे येथे covid-19 उपाय योजना संदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
नारायणगाव येथील कुकडी धरण प्रकल्पाच्या विश्रामगृहात आज दि. २६ रोजी दुपारी १ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीसाठी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार हनुमंत कोळेकर, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, कुकडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे, डॉ बनकर, डॉ वर्षा गुंजाळ, जुन्नर नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र घोलप, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, कांबळे तसेच विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यात तात्काळ १ हजार अँटीजेन किट्स उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ऑक्सिजन सुविधा जास्तीत जास्त पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. तोरणा ची लढाई अद्याप संपलेली नसून सर्व नागरिकांनी याबाबत प्रशासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे अशी माहिती वळसे-पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की कोरोना चा सामना करण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये विविध उपाय योजना सुरू आहेत.

यावेळी आमदार अतुल बेनके यांनी देखील कोरोना विषयी आढावा घेतला.

कुकडी धरण प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत