न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले असून त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. राराष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली

न्यायमूर्ती चंद्रचूड हे गेल्या १० वर्षात CJI म्हणून नियुक्त झालेले सर्वात तरुण व्यक्ती आहेत आणि सामान्य नागरिकांच्या न्यायापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांमध्ये ते आघाडीवर आहेत.पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले. वडिलांनंतर या सर्वोच्च पदावर पोहोचलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. पुण्यातलं कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड २९ मार्च ते ३१ ऑक्टोबर २०१३ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्याधीश म्हणून करण्यात आली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *