चिंचवड टपाल कार्यालयामध्ये पार्सल पॅक करून देण्याची सुविधा

०७ डिसेंबर २०२२

चिंचवड


भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्टनंतर आता चिंचवड टपाल कार्यालयामध्ये ग्राहकांचे पार्सल पॅक करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशीच सुविधा पुणे सिटी मुख्य कार्यालय ( लक्ष्मी रोड ) व पुणे मुख्य कार्यालय (साधू वासवानी चौक) येथेही दिली आहे . आतापर्यंत ८ हजार ५३५ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे . पुणे टपाल क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, ” ग्राहकांचा तीनही पार्सल पॅकिंग युनिटला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. परंतु अद्याप जनतेला फारशी माहिती नसल्यामुळे , जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील बुकिंग काऊंटरवर स्पीड पोस्ट , रजिस्टर पोस्ट बरोबरच एक डिसेंबरपासून पार्सल बुकिंग करण्याची सुविधा सुद्धा २४ तास उपलब्ध करून देण्यात दिली आहे . अशी आहे सुविधा ग्राहकांनी केवळ त्यांचे पार्सलद्वारे पाठवायचे सामान कार्यालयामध्ये घेऊन यायचे आहे . पॅकिंगसाठी छोटे , मध्यम आणि मोठ्या आकाराचे कार्टन बॉक्स , तसेच बबल रॅपिंग , बँड सीलिंग आणि थर्मोपोलिस शीट व पार्सल पॅकिंगचे मशिन उपलब्ध करून दिले आहे . बुकिंगपासून ते वितरित होईपर्यंत प्रत्येक पायरीवर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो . नंतर पाठविलेल्या पार्सलचे ट्रॅकिंग इंटरनेटवर आणि ‘ पोस्ट इन्फो ‘ या टपाल कार्यालयाच्या मोबाईल अॅपवर सुद्धा करता येते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *