महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक आमदार, प्रा. जयंत आसगावकर यांच्याशी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. १०/०८/२०२१.

       शासकीय विश्रामगृह पुणे, याठिकाणी, पुणे विभागाचे शिक्षक आमदार, प्रा. जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कानडे सर यांनी यावेळी नविन शैक्षणिक धोरण, शासनाची विविध परिपत्रके, अंशदायी पेन्शन योजना, डी. सी. पी. एस., विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, पार्ट टाईम शिक्षक, पवित्र पोर्टल तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आदी विषयांवर अभ्यासपुर्ण मांडणीने, विविध समस्या  व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली. तसेच, शिक्षण क्षेत्राच्या भविष्याविषयी चिंता निर्माण केली. तर अगदी अल्पावधीतच, शिक्षक आमदार आसगावकर सरांनी केलेल्या प्रभावी कामाचे त्यांनीबकौतुक केले. लवकरच या विविध समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचेसोबत मिटींगचे आयोजन करणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी सांगितले.
      महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या वतीने, यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आयुक्त कार्यालय तसेच संचालक कार्यालय स्तरावर, विविध मिटींगचे आयोजन करुन सोडवलेल्या प्रश्नांविषयी आमदार आसगावकर यांनी माहिती दिली.      या बैठकीवेळी शिक्षक नेते गणपतराव तावरे सर, रयत बॅंकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे सर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे समन्वयक दादासाहेब गवारे सर, पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस कांतिलाल आण्णा गवारे, तसेच भाजप च्या पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *