कोरोना प्रतिबंधात्मक लस मी आज स्वत:घेतली आहे. त्यानंतर मला कोणताही त्रास होत नसून ही लस सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया श्रावण हर्डीकर यांनी दिली.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी: दि १० फेब्रुवारी २०२१
पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये आयुक्त हर्डीकर यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.  यावेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी,. डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. करुणा साबळे, डॉ. रोहीत पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले पहिल्या टप्प्यामध्ये सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले असून दुस-या टप्प्यामध्ये शहर पातळीवर काम करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्याचे काम सुरु आहे.  तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक आतूरतेने वाट पहात असलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस यांना लवकरच उपलब्घ करुन देणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.