शहरात आढळले कोरोनाचे 17 बाधित रुग्ण

०९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


शहरात कोरोनाचे मंगळवारी (दि. 8) 17 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 2 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 132 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. 264 संशयित रुग्णांवर आज दिवसभरात कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 466 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 68 हजार 433 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 630 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *