संसदरत्न मा.खासदार डॉ अमोल रामसिंग कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठाण आयोजित मोफत कोविड लसीकरण शुभारंभ

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०२ ऑक्टोबर २०२१

आंबेगाव

संसदरत्न मा.खासदार डॉ अमोल रामसिंग कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठाण आयोजित मोफत कोविड लसीकरण शुभारंभ तसेच आंबेगाव तहसील कार्यालय येथील महसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचे वाटप स्वता खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थीतीत त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मोफत सातबारा वितरण, रेशन कार्ड, संजय गांधी व श्रावणबाळ योजना मंजूर प्रकरणातील लाभार्थी, ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम असे कार्यक्रम घेण्यात आले.

याकार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे,आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभपती देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, जयसिंग काळे, विष्णूकाका हिंगे, घोडेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अक्षय काळे आदी मान्यवार उपस्थित होते.

यावेळी अमोल कोल्हे यांनी महसूल विभागाने सुरू केलेल्या मोफत सातबारा वितरण कार्यक्रम, ई पीक पाहणी या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या जमिनींची नोंदणी व्यवस्थित व काटेकोर करून घ्यावी असे सांगितले. या वेळी कोविड काळात सोमनाथ काळे यांनी उल्लेखनिय कार्य केले ते कार्यक्रमाला आले नसता अमोल कोल्हे यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपुस करत त्यांना शाबासकीची थाप पांठिशी देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *