आवडीच्या नंबरसाठी तब्बल १६ कोटी

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळीमध्ये वाहन खरेदीचा टॉप गिअर होता . त्यात काही जणांनी आपल्या वाहनासाठी पसंतीला क्रमांक मिळावा म्हणून मोठी रक्कम मोजली . वाहनासाठी १ क्रमांक मिळावा म्हणून चार लाख रुपये मोजले . वाहनांच्या पसंती क्रमांकामधून जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या १० महिन्यांच्या कालावधीत १६ कोटी ३८ लाख ९ ७ परिवहन हजार ८५ ९ रुपयांचा महसूल पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाला मिळाला . त्यातून हौसेला मोल नाही , या म्हणीचा प्रत्यय आला. कोरोनानंतर वाहन खरेदीकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती . मात्र , यंदा परिस्थिती पूर्वपदावर आली . त्यामुळे यंदा अनेकांनी वाहन खरेदीला पसंती दिली . त्यातही दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी वाहनांसाठी आगाऊ नोंदणी केली होती . त्यामुळे यंदा वाहन विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले .सर्वाधिक भाव असलेले टॉप नंबर वाहनांसाठी आकर्षक व आवडीचा क्रमांक घेण्यासाठी चढाओढ सुरू असते . त्यासाठी लिलावात सहभागी होऊन आवश्यक शुल्क देखील भरले . यात १ या क्रमांकासाठी चाल लाख रुपये शुल्क भरले . त्याखालोखाल ००० ९ , ०० ९९ , ०७८६ , ० ९९९ , ९९९९ या क्रमांकांना पसंती देण्यात आली . या प्रत्येक क्रमांकासाठी ११ लाख ५० हजार रुपये प्रत्येक ग्राहकाने मोजले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *