फ्लाईंग मिल्खा सिंग पत्नीनंतर ९१ व्या वर्षी कोरोना ने कालवश

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडूनही श्रद्धांजली

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चंदीगड-दि १९ जून २०२१
प्रसिद्ध धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ मिल्खाया नावाने जगभर ओळख असलेल्या मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. 19 मे रोजी त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आणि तेव्हापासून ते आरोग्याशी संबंधित समस्येने पीडित होते. चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांची टीम सतत त्याच्यावर नजर ठेवत होती.

अलीकडेच सिंह यांची पत्नी निर्मल कौर यांचेही पोस्ट कोविडच्या गुंतागुंतमुळे मोहाली येथील रूग्णालयात निधन झाले. कौर 85 वर्षांच्या होती. त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या. आयसीयूमध्ये दाखल झाल्यामुळे मिल्खासिंग निर्मल कौर यांच्या अंत्यसंस्कारातही जाऊ शकले नाहीत.

Advertise

मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल देश-विदेशातील अनेक नामवंतांनी शोक व्यक्त केला आहे. एका ट्वीटद्वारे शोक व्यक्त करत भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी लिहिले की- महान खेळाडू मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे माझे हृदय दु: खाने भरले आहे. त्यांच्या धडपडीची आणि चरित्रशक्तीची कहाणी आपल्याला पिढ्यान्पिढ्या भारतीयांना प्रेरणा देईल. मी त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि असंख्य चाहत्यांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रातील एक उत्तुंग वेक्तिमत्व गमावल्याची दुःख आहे. त्यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली.
मिल्खा सिंग यांच्या जीवनावर भाग मिल्खा भाग हा सिनेमा आला होता त्यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांनी भूमिका साकारली आहे या सिनेमामुळे त्याचे जीवनपट लोकांसमोर आले होते. फरहान ने ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली त्यात प्रिय मिल्खाजी तुम्ही आमच्यात नाहीत हे मानण्यास मन तयार होत नाही. कदाचित तुमच्यासारखे माझे मन वागतंय आज थोडेसे हट्टी, थोडंस जिद्दी. खरे तर तुम्ही कायमच जिवंत अहात कारण तुम्ही साधे, प्रेमळ, सुहृदयी आहातच. त्यापलीकडे तुम्ही कष्ट, प्रामाणिकपणा, चिकाटी याचे प्रतीक अहात. यशानंतरही तुमची नम्रता आणि जीवनच अनेकांसाठी प्रेरणास