माझा वड माझी पूजा.एक झाड लावू या. पर्यावरण वाचवू या.- ज्योती दरंदले-भूगोल फाउंडेशन.

संगीता तरडे
विभागीय संपादिका

भोसरी- दि २२ जून २०२१
वटपौर्णिमा आली कि वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्या विकायला बाजारात येतात. नाहीतर ज्यांच्यासाठी वडाची पूजा करायची त्या नवरोबांनाच ‘येता येता वडाची फांदी तोडून आणा हो’ असं आधल्या दिवशी काहीजणी सांगणार. मैत्रीणींनो, ज्या वडाच्या झाडाखाली सावित्री ने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. त्या वडाच्या झाडाची आणि झाड जवळपास नसेल तर वडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा आपण नवऱ्याला निरोगी दिर्घायुष्य मिळावे, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पूजा करतो. गेले दिड वर्षे यमराजांचा मुक्काम पृथ्वीवरच आहे कि काय अशी शंका कोरोनामुळे येतेय. आँक्सिजन अभावी कितीतरी लोक या आजारात जीवाला मुकले आहेत हे एक वास्तव आहे. ह्याच आँक्सिजनचा स्रोत झाडे आहेत आणि वडाचे झाड हे जास्तीत जास्त आँक्सिजन वातावरणात सोडते. साधारण तासाला कमीत कमी सातशे किलो. उन्हाळ्यातही हे झाड भरपूर प्रमाणात पाणी बाष्प स्वरुपात वातावरणात सोडून वातावरण थंड ठेवायला मदत करते.

Advertise

अशा ह्या जीवनदायी झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची आपण पूजा करणार. वडाची फांदी झाडापासून तोडली म्हणजे ती अर्धी मृत झाली. जी फांदी स्वतःच अर्धमेली आहे म्हणजे झाडासारखे जिच्यात चैतन्य नाही त्या फांदीची पूजा करुन नवऱ्याचे दिर्घायुष्य मागायचे. अशी पूजा सफल होईल का? मैत्रीणींनो, नुसती पूजा करायची म्हणून, शास्रासाठी वडाऐवजी वडाच्या फांदीची पूजा करणे नुसते चूक नाही तर त्या झाडासाठी, पर्यावरणासाठी घातक आहे. वडाच्या परोपकारी, मोठ्या झाडाला पूजेसाठी तोडायचा, ओरबाडण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.

माझ्या मैत्रीणीने दरवर्षी पूजेसाठी म्हणून एका कुंडीतच वडाचे रोप लावलेले आहे. दरवर्षी घरच्या घरी चार शेजारणी गोळा करुन यथासांग ती वटपौर्णिमा साजरी करत असते. ‘फांद्या तोडायचे पाप नको गं बाई!’ असं ती म्हणते. मान्य आहे वटवृक्ष हा कुंडीतले झाड नाहीये पण फांद्या तोडण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे. आपण आपल्या बिल्डिंगमधील, सोसायटीमधील, आजूबाजूच्या मैत्रीणी, बायका एकत्र येऊन ह्या वर्षी रिकामी जागा बघून वटपौर्णिमेला एक वडाचे