पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज वयाची 80 वर्ष पूर्ण करत आहेत. या खास निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहतेच नव्हे तर, मनोरंजन विश्वातील कलाकार आणि राजकीय नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून बच्चन यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशातील सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत अशा सिनेकलाकारांपैकी एक आहात ज्यांनी कित्येक पिढ्यांचं मनोरंजन केलं आहे. तुम्हाला सुखी आणि समृद्ध आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *