एमसीए निवडणुकीत शरद पवारांचा आशिष शेलारांना पाठिंबा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ( एमसीए ) ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. देशातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक जवळ येऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी खेळाडू संदीप पाटलांना धक्का दिला आहे. शरद पवारांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे.

२० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध माजी अध्यक्ष शरद पवार यांचे गट समोरासमोर येणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. एमसीए निवडणुकीत समीकरणं अचानक बदलली आहेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत युती केल्याचं नुकतंच जाहीर केल आहे. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.शरद पवार आणि आशिष शेलार गटाने संयुक्त पॅनलसह लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना खूप मोठा धक्का बसला असून ते एकाकी पडले आहेत. पवार व शेलार गट यांनी एकत्रित पॅनल उभे करत आशिष शेलार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *