जन केंद्रांवर औषधी स्वस्त; पण मिळतात किती ?

पिंपरी प्रतिनिधी
०३ ऑक्टोबर २०२२


औषधांच्या किमती जास्त असतात . परिणामी, अनेक वेळा नागरिकांना औषध खरेदी करताना अडचण येते. सामान्य नागरिकांना कमी किमतीत औषधे मिळावी म्हणून प्रधानमंत्री भारतीय औषध योजन सुरू केली . या योजने अंतर्गत नागरिकांना जेनेरिक औषधे कमी दरात मिळतात. जवळपास ५० ते ८० टक्के जेनेरिक औषधे स्वस्त असतात. पंतप्रधान जन औषधी केंद्रावर ९० टक्के औषधे मिळतात. पूर्वीच्या तुलनेत आता जेनेरिक औषध उपलब्ध होत आहेत.

तसेच , नागरिक देखील आता जेनेरिक औषधांची मागणी करीत आहेत . परंतु जेनेरिक औषधांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक आहे . डॉक्टरांनी जेनेरिक औषधांनाप्राधान्य दिले पाहिजे, असे औषध विक्रेत्यांनी सांगितले. अनेकदा संबंधित दुकानांमध्ये काही विशिष्ट महागड्या औषधांची जेनरिक औषधे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव खर्चिक औषधांचाच पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामुळे जेनेरिक औषधांच्या दुकानांमध्ये सर्वच प्रकारचे औषध उपलब्ध असणे आवश्यक आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *