मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नारायणगाव प्रतिसाद
नारायणगाव 27 एप्रिल2021
कार्यकारी संपादक, किरण वाजगे, नारायणगाव
कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार नारायणगाव तालुका जुन्नर येथील जैन सोशल क्लब ,जैन श्रावक संघ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील महावीर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 365 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरवर्षी महावीर जयंतीच्या निमित्ताने 1999 पासून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरास जुन्नर, आळे, बेल्हे, मंचर, नारायणगाव येथील जैन बांधवांसह सर्वधर्मीय रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. विशेष म्हणजे 56 महिला रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
यावेळी जैन सोशल क्लबचे संस्थापक अशोक गांधी,अध्यक्ष अभय कोठारी,उपाध्यक्ष धनेश शेलोत,सकल संघाचे अध्यक्ष मनोज
दर्डा, उपाध्यक्ष संदिप मुथ्था,जैन महिला सोशल क्लबच्या अध्यक्षा ज्योतिताई गांधी,उपाध्यक्षा हेमा दर्डा
यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विद्यमान आमदार अतुल बेनके,जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,माजी आमदार व जिल्हा शिवसेनाप्रमुख शरद सोनवणे, तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सरपंच योगेश पाटे,वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर,विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, नारायणगाव शहर अध्यक्ष रोहिदास केदारी,खजिनदार गणेश वाजगे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नवजीवन मेडिकल रिलीफ अँड रिसर्च फाउंडेशन यांनी रक्त संकलन केले.