संजय राऊतांनी भेट मागितली तर त्यांना नक्की भेटणार – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हटले, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले.

तसेच राजकीय कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, संजय राऊतांनी भेट मागितली तर त्यांना नक्की भेटणार, राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी सर्वांना मिळून ठरवावं लागेल, कुठलाही एक पक्ष हे ठरवू शकत नाही, आणि नेत्यांनी शांत राहायचं, इतरांना बोलायला लावायचं ही पद्धत बंद करायला हवी असे सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *