आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही; गिरीश महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही. कारण काही गोष्टींमध्ये मीही साक्षीदार आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

ते म्हणतात भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही. मात्र, ते दाऊदच्या अनुयायांसोबत जाऊन बसले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला. तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर लढलात, आमच्यासोबत लढलात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावले आणि मतं घेतली. आता तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन पुढे म्हणाले, तुम्ही आता शपथ घेऊन सांगता. आधी प्रचाराच्यावेळी एखाद्या व्यासपीठावर भाषण सुरू असताना सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं. मात्र, आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही. कारण काही गोष्टींमध्ये मीही साक्षीदार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *