सुषमा अंधारे यांची नारायण राणेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सडकून टीका केली. जे नारायण राणे शिवाजी पार्कवर सोनियांचे विचार ऐकायचं का असं म्हणतात, ते नारायण राणे याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत होते, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारेंनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, नारायणराव, आम्हाला तुमच्या दोन वाह्यात बाजार बुणग्यांवर बोलायचंच नाही. पण, नारायण राणे तुम्ही शहाणेसुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी, तुम्ही म्हणावं की शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे आहे का? विसरलात का त्याच सोनियांच्या पायावर लोटांगण घालत गेली १० वर्षे तुम्ही आमदारकी, खासदरकी, महसूलमंत्री अशी पदं भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं का आम्हाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *