महादेव कोळी चबुतरा अभिवादन कार्यक्रम जुन्नरमध्ये संपन्न

बातमी प्रतिनिधी विकास भालचिम, आंबोली

आपण महादेव कोळी चबुतरा अभिवादन दिनानिमित्ताने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो. त्यामध्ये रॅली, व्याख्याने, वेगवेगळ्या स्पर्धा, आदिवासीं नृत्य, अभिवादन सभा, असे असंख्य कार्यक्रम आपण आपल्याला जमेल त्या पद्धतीने आयोजित करून आपण हा दिवस साजरा करत असतो.

परंतु या वर्षीच्या covid-१९ च्या महामारीमुळे आपण हे सर्व दरवर्षीप्रमाणे या वर्षी साजरे करू शकलो नसलो तरी आपण काही कार्यक्रम हे आपल्याला जमेल त्या पद्धतीने करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्या पद्धतीने आपण हा दिवस वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला.

त्यामध्ये ऑनलाईन व्याख्याने व वीरगती प्राप्त झालेल्या १६०० महादेव कोळी क्रांतिकारकांच्या स्मृतीस अभिवादन व प्रबोधन अशा पद्धतीने आपण हा दिवस या वर्षी covid च्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा केला. व यासाठी आपण सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला.

शिवनेरीच्या पायथ्याशी १६०० महादेव कोळी वीरांना अभिवादन करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणपत घोड यांनी केले तर प्रातिनिधिक स्वरूपात मा. श्री. तुळशीराम भोईर (संचालक पी. डी. सी.बँक, माजी समाजकल्याण सभापती) श्री दत्ताभाऊ गवारी, श्री. विश्वनाथ निगळे सर,श्री. गौतम डावखर, PSI साबळे यांनी आपले विचार मांडले शेवटी प्रा.संजय मेमाणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी श्री.सुनील विरणक सर, प्रा. ज्ञानेश्वर सावळे, श्री.मोहन लांडे सर, श्री. नवनाथ गवारी, श्री.भालींगे सर, श्री. विलास साबळे श्री.बाळकृष्ण लोहकरे सर, श्री.राजू शेळके, PI युवराज मोहिते साहेब जुन्नर, आंबे – पिंपरवाडीचे सरपंच श्री मुकुंद घोडे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी जुन्नर पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.