रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय -: कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे…लोणावळा येथील संघटनेच्या शिबिरात घेतला निर्णय

रोहित खर्गे
विभागीय संपादक
लोणावळा- दि १० जून २०२१
कोरोना लॉकडाऊन मुळे मागील १४ महिने रिक्षा व्यवसाय बंद होता. यामुळे रिक्षाचे हफ्ते थकले आहेत. परंतु आता सरकारने लॉकडाऊन शिथील करताच फायनान्स कंपनीच्या वतीने रिक्षा कर्ज हफ्त्यासाठी तगादा लावण्यात येत आहे व रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालक त्रस्त झाले असून फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवार दिनांक १८ जून रोजी सकाळी 11.00 मोर्चा आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्रातले सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांनी केले आहे.

कष्टकरी पंचायत वतीने लोणावळा येथे संघटना पदाधिकारी यांचे पावसाळी विचार मंथन शिबीर आयोजित केले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच पुण्यामधील मोफत रिक्षा रुग्ण वाहिका सेवा उपक्रमातील सहभागी रिक्षा चालक योद्ध्ये यांचा बाबा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घर कामगार महिला सभा अध्यक्षा श्रीमती आशाताई कांबळे, कष्टकरी जनता आघाडीच्या महिला अध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष जयश्री येडके, मधुरा डांगे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, कला आणि सांस्कृतिक आघाडी विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुराद काजी, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, विजय ढ़गारे, जाफर भाई शेख, संजय दौंडकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला बांधकाम मजूर व धारकांसाठी दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली सदर रक्कम लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु नुसती तुटपुंजी आर्थिक मदत करून चालणार नाही कोविड-19 मुळे कष्टकरी जनतेचे जग बदलले आहे आणि हातावर पोट असणाऱ्या या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कष्टकरी जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर उपायोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी टास्क फोर्स स्थापन करावे अशी मागणी मी सरकारकडे केली आहे.
रिक्षाचालकांचे, टेम्पो, ट्रक आणि सर्व वाहतूकदार यांचे हफ्ते थकल्यामुळे या गाड्या ओढून नेल्या जात आहेत. गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी. पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे, परंतु आयुक्त यात खोडा घालत आहेत या प्रश्नांची दखल घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक अठरा जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात यावे असे आवाहन यावेळी बाबा कांबळे यांनी केली आहे.
” कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पदी अनिता साळवे उपाध्यक्षपदी मधुरा डांगे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्षपदी शफिक भाई पटेल, कार्याध्यक्षपदी कुमार शेट्टी, उपाध्यक्षपदी अरशद अन्सारी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कला व संस्कृती आघाडी महाराष्ट्र प्रमुख पदी मुराद काजी, लोणावळा शहराध्यक्षपदी आनंद सदावर्ते यांची निवड करण्यात आली,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबू भाई शेख, टपरी हातगाडी पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष गणेश चव्हाण, आनंद सदावर्ते, हाजी अब्बास खान, विनय बच्चे, भगवान धनवट, रवींद्र ताकतोडे, संजय डेंगळे, विलास केंद्रे, चंद्रकांत बालगुडे,सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले आहेत.