हिमालयातील एक गुहा चंद्रकांत खैरेंसाठी आरक्षित करावी लागणार आहे – शहाजी पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. बंडखोरी केलेले सर्व आमदार निवडणुकीत पराभूत होतील. ते पडले नाहीतर मी हिमालायात जाणार, असे खैरे यांनी म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांनी टीप्पणी केली आहे.

दिल्लीला जाऊन हिमालयातील एक गुहा चंद्रकांत खैरेंसाठी आरक्षित करावी लागणार आहे. एका वर्षाने चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयात जावे लागणार आहे. अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळं केलं आहे. उद्धव ठाकरे बाप चोरल्याचा आरोप करतात. मात्र, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडात हे वाक्य शोभत का?,असा सवालही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *