अजित पवारांना आता सत्तेची स्वप्न पडायला लागली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२


रविवारी साताऱ्यात झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की आम्ही सत्तेत असताना आमच्या हातात सर्व संस्था होत्या. पण आम्ही कधी सत्तेचा माज दाखवला नाही. आज राज्यात जे काही चाललं आहे, ते गंभीर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना मला एढचं सांगतो की, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. सत्तेत असणाऱ्यांच्या सांगण्यावरुन कोणालाही त्रास देऊ नका. आम्ही सत्तेत कधी येऊ, हे तुम्हाला कळणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना टोला लगावला आहे.

अजित पवारांना आता सत्तेची स्वप्न पडायला लागली आहे. अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाही सारखं एकतर्फे सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत. अशी परिस्थिती आहे असा टोला बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *