बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे
न्हावरे (शिरुर) – गुरुवार दि.१२/११/२०२० रोजी विविध मागण्यांसंदर्भात, रा. प. घोडगंगा सह. साखर कारखाना न्हावरा येथे, शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या…
१) गळीत हंगाम २०१८-१९ मधील प्रति टन ५०० रु. प्रमाणे व गळीत हंगाम २०१९-२० मधील २०० रु.प्रति टन प्रमाणे रक्कम सभासद/शेतकऱ्यांना देऊन, दिलेल्या शब्दा प्रमाणे सभासदांची दिवाळी गोड करावि
२) कामगारांची देणी/पगार व दिवाळी बोनस २० टक्के द्यावा
३) २००९ साली ७ कोटी ७५ लाख रुपयांच्या सभासदांच्या घेतलेल्या ठेवींचे, गेल्या ११ वर्षांचे व्याज द्यावे
४) मयत सभासदांच्या वारसदारांची नोंदणी करुन वारसदारांना सभासद करावे
आमदार अशोक पवार व त्यांचे नातेवाईक यांच्या कडून, शिवसेना तालुका प्रमुख व घोडगंगाचे संचालक श्री सुधीर फराटे इनामदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा, शिवसेना शिरुर तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला.
या मागण्यांचे निवेदन कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री ढेकाणे साहेब यांनी स्वीकारले.
शिवसेना उपनेते, खासदार श्री शिवाजीदादा आढळराव पाटील व जिल्हा प्रमुख श्री माऊली आबा कटके यांचे बरोबर सहा. पोलीस निरीक्षक मोटे यांनी फोनवर चर्चा करून, कारखाना प्रशासनास १० दिवसांची मुदत दिली असून, योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिरुर तालुका शिवसेनेच्या वतीने सभासदांच्या व कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी, ऊसाच्या बाजारभावा साठी उपोषण करण्याचा इशारा देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष काकासाहेब खळदकर, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष राहुल गवारे, यांनीही सदर मागण्यांना व या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती सुधीर फराटे यांनी दिली.
या आंदोलनात, गणेश जामदार (शिरुर आंबेगाव शिवसेना तालुका प्रमुख), सुधीर फराटे इनामदार (शिरुर तालुका शिवसेना प्रमुख), सौ. चेतना ढमढेरे (शिरुर तालुका महिला संघटिका), योगेश ओव्हाळ (शेतकरी सेना तालुका प्रमुख) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पोपट निंबाळकर (मा. सरपंच मा. चेअरमन), संभाजी नांद्रे (मा.सरपंच), विरेंद्र शेलार (शिरुर तालुका शिवसेना विधानसभा संघटक), समाधान डोके (तालुका संघटक), सुनील जाधव (युवासेना प्रमुख शिरुर), संतोष भोंडवे (उपतालुका प्रमुख), संजय पवार (उपतालुका प्रमुख), नितीन दरेकर (उपतालुका प्रमुख), निलेश मचाले (विभाग प्रमुख), आंनद ढोरजकर (उपविभाग प्रमुख), मानसिंग कदम (उपविभाग प्रमुख), रोहिदास खेडकर (शहर प्रमुख), स्वप्नील रेड्डी (उपशहर प्रमुख युवासेना), गणेश शिंदे (उपशहर प्रमुख), सुरेश कोंडे, गणेश फराटे, जगताप गुरुजी, तुकाराम थोरात (व्हा.चेअरमन), जयसिंग हराळ, उदमले, संतोष पवळे, दत्तात्रय काळे, नवनाथ दौंडकर, बाजीराव शिंदे, वाडेकर आप्पा, धंनजय शेलार, विजय गरुड, बाळासो जगताप, पांडुरंग भेसके, महेंद्र येवले, आकाश चौरे, दत्तात्रय शिंगोटे, सिद्धांत चव्हाण, विनोद फलके, आबा फलके, भिवा उकले व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.