जुन्नर तालुक्यात आंबे गव्हाण येथे अनोखे ध्वजारोहण

दिपक मंडलिक
बातमी प्रतिनिधी
२८ जानेवारी २०२२ 

ओतूर


श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शारदाबाई पवार विद्यालय

The honor of hoisting the Indian flag was given to Shubhamendra Gawande, the top scorer in the tenth class.
ध्वजारोहन करण्याचा मान इयत्ता दहावी मधील प्रथम आलेला विद्यार्थी शुभम राजेंद्र गवांदे यास देण्यात आला

आंबेगव्हाण ता. जुन्नर या विद्यालयाचा प्रजासत्ताक दिन सोहळा नुकताच संपन्न झाला, यावर्षी ध्वजारोहन करण्याचा मान इयत्ता दहावी मधील प्रथम आलेला विद्यार्थी शुभम राजेंद्र गवांदे यास देण्यात आला व यापुढे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचे ध्वजारोहण इयत्ता दहावी मधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होईल असा निर्णय घेण्यात आला.

ही संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री माणिक बोऱ्हाडे यांनी ग्रामस्थांपुढे मांडली व त्यास श्री निलेश महाले, श्री नारायण शेठ कालेकर, श्री संदीप महाले, सरपंच निवृत्ती दराडे, उपसरपंच श्री दत्तात्रेय गवांदे, विजय वाघमारे, शंकर पाटील गायकर यांनी सहमती दिली. प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खुशीचे वातावरण होते याप्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच विद्यालयाच्या सर्व सेवक वर्ग याप्रसंगी उपस्थित होता विद्यालयाचे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संस्था अध्यक्ष श्री विशाल शेठ तांबे, श्री वैभव शेठ तांबे, सचिव खजिनदार श्री मयूर शेठ ढमाले संचालिका नीलम ताई तांबे यांनी कौतुक केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *