एकनाथ खडसे यांची अमित शाह यांच्यासोबत फोनवर चर्चा; एकनाथ खडसेंनी दिलं स्पष्टीकरण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून पुन्हा एकदा भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण भेट होऊ शकली नाही. खडसेंची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली. या चर्चेबाबत शरद पवार यांना माहिती दिली असल्याचे त्यांनी एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले. अमित शाहांना भेटू नये असा नियम आहे का,शाहांना अनेक वेळा भेटलो. देवेंद्र फडणवीस यांची पण भेट घेणार आहे. याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *