मुसंडी’ ठरेल यशाची गुरुकिल्ली

१९ डिसेंबर २०२२


समृद्ध आशय आणि विषय घेऊन मराठीत अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा ठरू पाहतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा बळावलेली असते. अशावेळी मनोधैर्य उंचवण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हा विषय केंद्रस्थानी ठेवून दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ‘मुसंडी या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवण्याचा अमुक एक पॅटर्न” नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ठरलेले ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी,मिळालेल्या अपयशामुळे खचून न जाता , पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची ‘मुसंडी मारता येऊ शकते. हे दाखवणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित ‘मुसंडी’ हा चित्रपट ५ मे २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गलगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे. , माणिक काळे, सुजीत मगर, मयूर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत.

MPSC / UPSC स्पर्धापरीक्षांवर भाष्य करणारा ‘मुसंडी’ चित्रपट ५ मे ला प्रदर्शित

‘मुसंडी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी बोलताना लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, राज्यसह देशातील , IAS/IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची रचना करण्यात आली. स्पर्धा परीक्षामधील अपयश व त्यातील आव्हाने याचा सामना कसा करावा हे अनेकांना उमजत नाही अशासाठी हा चित्रपट यशाची गुरुकिल्ली ठरेल असं मत एमपीएससी बोर्ड महाराष्ट्र राज्याचे चेअरमन मा. किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. या माहितीला सर्वोतपरी मदत करणारे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा. शेखर गायकवाड यांनी असा विषय लोकांसमोर येणे हे गरजेचं असल्याचं सांगताना हा विषय आणल्याबद्दल निर्माते व दिग्दर्शकांचे आभार मानले. आजच्या युवकाना दिशा देण्याचे काम मुसंडी चित्रपट करेल असा विश्वास निर्माते व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी एमपीएससी बोर्ड महाराष्ट्र राज्याचे चेअरमन मा. किशोरराजे निंबाळकर, माजी मंत्री मा. राम शिंदे, शेखर गायकवाड (साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य), मा. अनिल कवडे (सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य), मा. सुरज मांढरे (शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य), मा. नामदेव चव्हाण(अप्पर पोलीस आयुक्त पुणे), मा. मितेश गट्टे (अप्पर पोलिस अधीक्षक पुणे ), मा. मिलिंद सोबले (डि. डि. आर. पुणे ग्रामीण), विशाल सोळंकी (आय ए एस), मा. धनंजय आखाडे (अप्पर आयुक्त जी. एस. टी पुणे), मा. राहुल जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी देवस्थान), मा. मेघराज राजे भोसले (चित्रपट महामंडळ अध्यक्ष ), मा. मच्छिंद्र लंके (कन्हैया उद्योग समूह), मा. आनंद माळी, मा. सुनील चव्हाण (कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे), मा. अंकित गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), मा. श्री वैभव नागणे (उद्योगपती) मा. पांडुरंग वाटारकर (माजी ‍कृषी आयुक्त‍ ‍ महाराष्ट्र राज्य ), मा. इंद्रनील चितळे (युवा उद्योजक चितळे उद्योग समूह पुणे), मा. बाळासाहेब शिंदे साहेब (अध्यक्ष पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य) याच्यासह अनेक आयएएस (IAS), आय पी एस (IPS )उद्योजक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘मुसंडी ५ मे २०२३ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *