भोसरी चे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देत 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी!

पिंपरी-चिंचवड
दि.06/04/2023


अज्ञात व्यक्ती विरोधात भोसरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

आमदार महेश लांडगे यांच्या हेल्पलाइन नंबर वर अज्ञाताकडून संदेश पाठवून 30 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आमदार लांडगे यांच्याकडून नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन नावाची हेल्पलाइन चालवली जाते.या हेल्पलाइन नंबर वर एक मेसेज आला असून यामध्ये 30 लाख रुपये ची खंडणीची मागणी करण्यात आली आहे.तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी अज्ञात इसमानाकडून देण्यात आली आहे. महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाइन चे काम करणाऱ्या यश पवार यांनी हा मेसेज मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बघितला.याप्रकरणी यश पवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाइनच्या व्हाट्सअप क्रमांक वर मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी हा धमकीचा मेसेज आला त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *