धनगरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे सरपंच महेश शेळके यांनी गुलाब पुष्प देऊन , त्यांचे स्वागत करून ,केले खाऊ वाटप

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
११ ऑक्टोबर २०२१

ओझर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये किलबिलाट ऐकु येऊ लागला.जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि त्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केल्याची माहिती सरपंच महेश शेळके यांनी दिली.धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला.संपूर्ण गावातून या शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची अत्यंत उत्साहात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.शाळेत प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले व खाऊ वाटप करण्यात आले.

जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊन लागले आणि शाळा बंद पडल्या त्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे शासन परिपत्रकानुसार शाळेची घंटा वाजली.बऱ्याच दिवसानंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण होते.धनगरवाडी गावचे युवासरपंच महेश शेळके, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी स्वागत मुलांचे स्वागत आणि कौतुक केले.ग्रामस्थांकडून झालेल्या या स्वागतामुळे सर्व विद्यार्थी भारावून गेले.या वेळी सरपंच महेश शेळके यांनी मुलांना या शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र शेळके, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका फापाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती शेळके, उपाध्यक्ष हनुमान शेळके, रमेश पाटोळे,रमेश शेळके,अमोल भोर,श्रीहरी पाटोळे ,भास्कर शेळके, प्रताप शेळके, ग्रामपंचायत सदस्य सोनल पवार, प्रियंका शेळके, नयना कराळे, निर्मला घोगरे, वसंत शेळके,शाळेचे शिक्षकवृंद रंगनाथ पवार , प्रतिभा घंगाळे , निलेश ढवळे, राजेश दुरगुडे उपस्थित होते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.सुमारे दीड वर्षानंतर शाळा चालू झाल्या आहेत.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देणार आहोत,याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *