सुप्रिया सुळे बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत; शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांचा दावा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट करत टीका केली होती. एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट करत रविकांत वरपे यांनी टीका केली होती.

त्यानंतर आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्वीट केलाय. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहे..हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ? असा ट्विट म्हात्रे यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळेंवर आरोप करत करण्यात आलेल्या या फोटो ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. हा फोटो बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *