दवाखान्यात रुग्णाची लूट थांबण्यासाठी या वर्षाचे हॉस्पिटलचे दरपत्रक ठरून द्या – प्रमोद दिवेकर

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१४ जानेवरी २०२२

बेल्हे


हॉस्पिटल वर शासनाच नियंत्रण नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा बिल आकारली जातात. असल्याने या वर्षी लवकरच हॉस्पिटलांना दर पत्रक ठरवून द्यावेत.अशी मागणी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती चे प्रवक्ता प्रमोद दिवेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना आणि नव्याने आलेला ओमायक्रॉन धुमाकूळ घालत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन्ही लाटेत सामान्य नागरीक भरडला आहे,लघु उद्योग मोडकळीस आला आहे.

अनेक कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडले असून त्यांची हॉस्पिटल ची बिल भरून अजूनही कर्जातून सावरलेले नाही. हॉस्पिटल वर शासनाच नियंत्रण नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा बिल आकारली जातात.या वर्षी आपण लवकरच हॉस्पिटलांना दर पत्रक ठरवून द्यावे. ग्रामीण भागात हॉस्पिटल चे बिल भरण्याची परिस्थिती नसल्यामुळेही हॉस्पिटला जाण्यास नागरीक टाळाटाळ करतात आणि मृत्यू होतो. आपण स्तरावर बैठक घेऊन हॉस्पिटल चे शासन दर पत्रक ठरवून द्यावे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कर्जातून आपण वाचवू शकतो. अशी मागणी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *