स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव विद्यालयाची प्रभात फेरी अतिशय उत्साहात संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१३ ऑगस्ट २०२२

घोडेगाव


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे प्रभात फेरी. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक ११/८/२०२२रोजी गावातून प्रभात फेरी काढली. सकाळी पावसाच्या सरी कोसळत असताना देखील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात विविध घोषणा देत गावातून जनजागृती फेरी काढली. भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व सर्वांनी आपल्या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती.

सर्वप्रथम आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष  तुकाराम काळे, संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, विद्यालयाचे चेअरमन  सुरेश शेठ काळे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे संचालक एडवोकेट संजय आर्वीकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान, जय किसान अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी भर पावसात संपूर्ण गावात फेरी मारून अमृत महोत्सवा निमित्त जनजागृती कार्यक्रम पार पाडला. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्य मेरी फ्लोरा डिसूजा ,प्राचार्य रेखा आवारी, विद्यालयाचे शिक्षक  समीर मुजावर, कैलास जाधव, सोनीका मस्कारेन्हस, ज्योती जाधव, मीनाक्षी रसाळ, चेतन पोखरकर, तानाजी फुलमाळी,संदीप सोमवंशी, ज्योती रोकडे, प्रवीण नायकोडी, स्मिता लांडे, नितीन गायकवाड, सागर लोखंडे संगीत शिक्षक गंगाराम तनपुरे इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *