ओतूर येथे महावितरण कडून वीजबिल दुरुस्ती व ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजन

दिपक मंडलिक
बातमी प्रतिनिधी
१५ मार्च २०२२

ओतूर


ओतुर येथे कृषी योजना २०२० च्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या शिबीरात सुमारे ३०० कृषीपंप ग्राहकांनी सहभाग नोंदवुन थकलेली वीज बीले भरुन थकबाकी मुक्त होण्याचा बहुमान मिळवला. महावितरण तर्फे कृषी योजना २०२० सुरु असुन, सदर योजनेत आगामी ३१ मार्च पर्यंत थकबाकीदार शेतकरी सहभागी होऊ शकतात. सदर योजनेपासुन वंचीत राहीलेल्या शेतकऱ्यांना अंतीम टप्प्यात योजनेचा लाभ मिळावा यासाठी आज सोमवार दि. १४ रोजी आळेफाटा उपविभाग अंतर्गत ओतुर येथे वीज बील दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्याण सुमारे ३०० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपले वीज बील समजावुन घेतले. तर आवश्यकता असलेली काही वीज बीलांची तात्काळ दुरुस्ती देखील करण्यात आली.

 

दरम्याण बहुतांश शेतकऱ्यांनी तात्काळ वीज बील भरण्याची भुमिका घेत थकबाकीमुक्त होण्याचा बहुमान मिळवला. तर कार्यकारी अभियंता नारखेडे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पन्नीकर साहेब तसेच उपकार्यकारी अभियंता घुले साहेब यांनी प्रातिनीधीक स्वरुपात थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार केला. तसेच सदर योजनेची माहीती परिसरातील अन्य शेतकऱ्यांना द्यावी असे देखील आवाहन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *