जिल्हा विधी न्याय प्राधिकरण यांच्या वतीने जुन्नर येथे “लोकआदालत”चे आयोजन…

जुन्नर प्रतिनीधी
१३ ऑगस्ट २०२२


१३ ऑगस्ट रोजी जुन्नर येथे कर्जदारांना व विविध राष्ट्रीयकृत १ बँक ,पतसंस्था ,महापारेशन  फायनान्स बँका इ मध्ये समेट घडवून आणणे कामी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण यांचे वतीने “लोकआदालत”चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जुन्नर चे नूतन वास्तू इमारत मध्ये ११.वाजता जुन्नर चे मुख्य प्रथम  न्यायाधीश मेहेरबान पी व्ही सपकाळ सो .व दुय्यम न्यायाधीश व्ही आय घोरपडे सो. व मेहरबाण पी के राठोड मॅडम इ च्या उपस्थिती मध्ये सदर लोकआदालत चे उदघाटन करण्यात आले. सेवानिवृत्त  सैनिक देशसेवक सुरेश भोर यांचे हस्ते श्रीफळ फोडण्यात आला.

सदर उदघाटन प्रसंगी सरकारी वकील गोकुळ खोडे व जुन्नर बार असोसिएशन चे अध्यक्ष केतन पडवळ ,गुलजार खान, सुदर्शन पारखे ,रत्ना हांडे ,गणेश भालेराव .सदर उदघाटन वेळी मा.मुख्य न्यायाधीश यांनी मनोगत व्यक्त केले व नागरिकांनी अधिकाधिक लोकआदालत चा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *