घोडेगाव येथे काढली चिमुकल्यांनी प्रभात फेरी

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१३ ऑगस्ट २०२२

घोडेगाव


शनिवार दिनांक १३/८/२०२२ रोजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगावच्या प्री -प्रायमरी विभागात “स्वातंत्र्य दिनाचा” “अमृत महोत्सव “उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. आज विद्यालयाच्या प्री -प्रायमरी विभागाच्या चिमुकल्यांची प्रभात फेरी जल्लोषात काढण्यात आली. सर्व चिमुकल्यांनी ” भारत माता की जय ” , “वंदे मातरम”, “जय जवान जय किसान “अशा घोषणा करत प्रभात फेरीचा आनंदाने आस्वाद घेतला. तसेच लहान चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले , त्यांना न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोजा मॅडम व उपप्राचार्य रेखा आवारी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

 

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे,उपाध्यक्ष तुकाराम काळे, सचिव विश्वासराव काळे, विद्यालयाचे चेअरमन सुरेशशेठ काळे, संचालक ऍडओकेट संजय आर्वीकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्री प्रायमरी विभागाच्या शिक्षिका सोनाली काशिद, मनीषा बांबळे, स्वाती शेटे, शिवानी बांगर, सुप्रिया हुले, मनीषा आहेर यांनी मार्गदर्शन केले. तसेच चेतन सर,प्रवीण नायकोडी,संगीत शिक्षक गंगाराम तनपुरे सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *