शहरातील दिव्यांग वेक्तींसाठी महानगरपालिका व स्पार्क मिंडा फाउंडेशन राबविणार विनामूल्य लसीकरण मोहीम…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. २० जुलै २०२१ :- शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्पार्क मिंडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी विनामुल्यकोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास स्पार्क मिंडा फाऊंडेशन यांच्यासामाजिक जबाबदारी विभागाचे(CSR)सहकार्य लाभले आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरीक महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व स्थायी समितीचे सभापती अॅड.नितीन लांडगे यांच्याहस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या भिमाबाई फुगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,राजेश आगळे, महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा भावसार,प्रशासन अधिकारी नाना मोरे,स्पार्क फाऊंडेशनचे नितिका गुल्हाने-लोहे, निलेश पवळे, सुमेध लव्हाळे, संजय खैरकर ,माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर आणि इक्वीटस फायनान्स वतीने बँकेचे अधिकारी संग्राम पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमास सी.एस.आर माध्यमातून मदत उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या सी.एस.आर सेल यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सदर उपक्रम केवळ दिव्यांग व्यक्तींकरीता असून तो दि. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे चालू राहणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *