कल्याण – नगर महामार्गावर स्कार्पिओ ची जोरदार धडक लागून रस्ता क्रॉस करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक
७ जानेवारी २०२२

बेल्हे


आणे (ता. जुन्नर) येथील कल्याण-नगर महामार्गावरील बसस्थानक चौकात वारंवार अपघात होत असल्याने हा चौक मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.रस्ता क्रॉस करताना एक जेष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला.याठिकाणी आळे -राजुरी प्रमाणे डांबरी गतिरोधक बनवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे.मात्र याकडे आमदार-खासदार कोणीही लक्ष देत नाही असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार (दि.६) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास माधव गोफणे (वय-५९) राहणार पेमदरा ता. जुन्नर,जिल्हा.पुणे हे रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओची जोरदार धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. या चौक परिसरात वर्दळ खूप असते त्यामुळे येथे वाहनांचा वेग कमी होणे अपेक्षित आहे.येथे गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट जातात त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.

गतिरोधक करण्यासाठी आमदार-खासदार लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप

स्कॉपिओ कार नंबर एम.एच.०४/डी.एन.९८८४ गाडी चालक संजय नारायण आंबूरे (सध्या रा.अंधेरी मुंबई, मुळ रा. जिंतुर,ता.जि.परभणी) यांच्या विरोधात विशाल माधव गोफने (वय -२६) राहणार पेमदरा (ता.जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून स्कार्पिओ चालका विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत. “या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते परंतु तेही सध्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे येथे आळे व राजुरीच्या स्थानकात जसे कायमस्वरूपी डांबरी गतिरोधक आहेत तसे गतिरोधक बनवावेत अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यासाठी आमदार-खासदारांनी लक्ष देऊन येथे वारंवार होणाऱ्या अपघाताचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *