मरीआई देवीचे उपासक व पुजारी म्हणजेच पोतराज पिढ्यान -पिढ्या महाराष्ट्रभर करीत आहे मरिआई देवीचा प्रसार, प्रचार व या संस्कृतीचे जतन

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
७ जानेवारी २०२२

ओझर


बया ,दार उघड ,बया ,दार उघड “
मरीआई बया ,दार उघड
लक्ष्मीआई बया ,दार उघड”

मरीआई ही मूळची आंध्रप्रदेशातील देवता आहे. आंध्र प्रदेशात अनेक गावात तिची पूजा केली जाते .कर्नाटकात कारवार जिल्ह्यात शिरसी या गावात मरीआईचे मंदिर असून दरवर्षी तेथे तिची मोठी यात्रा भरते. ह्या मरीआई देवीला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट दूर होते अशी लोकांची भावना आहे. व ह्या मरीआईच्या देवीची उपासना करणार्याला पोतराज असे म्हणतात. या पोतराज मार्फत देवीला प्रसन्न करून घेता येते अशी लोकांमध्ये भावना आहे. परंतु सध्या आता समाज बदलला आहे .तसेच सोलापूर जिल्ह्यातील पेनुर या गावचे एक दांपत्य साहेबराव जाधव व मंगल ताई जाधव हे दांपत्य गेली अनेक वर्ष मरिआई देवीचा उपासना तिचा प्रचार व प्रसार करीत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक गावागावात जाऊन ,पायी चालत ते देवीचा प्रसार व प्रचार करीत आहे. परंतु साहेबराव जाधव यांच्या म्हणण्यानुसार आता समाज बदलत चाललेला आहे . आमच्या पेनुर गावातील मुलांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे ज्या काही मुलांसाठी शैक्षणिक शासकीय योजना असतील तर त्या मुलांना मिळायला पाहिजेत. त्याच प्रमाणे आमच्या पेनूर गावांमध्ये एखादी मुलांसाठी आश्रम शाळा शासनाने चालू करून दिली पाहिजे. मुले शिकली पाहिजेत, त्यांनी हा व्यवसाय न करता नोकरी पाण्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी साहेबराव जाधव यांनी त्यांच्या समाजाच्या वतीने शासनाकडे केली आहे.

 

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *