पिंपरी चिंचवड मधील कोविड सेंटरवर बेड ची संख्या वाढवावी- अक्षय घोडके

पिंपरी-चिंचवड प्रतिनीधी
07/04/2021

पिंपरी चिंचवड मधील कोविड सेंटरमधील ॲाक्सिजन बेड,व्हेटिलेटर बेडची संख्या त्वरित वाढवावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके यांनी केली आहे.

अक्षय घोडके यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटिल यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून शहरामध्ये २५०० पेक्षा अधिक जास्त कोरोना रूग्ण मिळून येत आहेत हि बाब अत्यंत गंभिर असून सध्या रूग्णांना ॲाक्सिजन बेड तसेच व्हेटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत या अभावी रूग्णांना घरी पाठवले जात आहे हि बाब अत्यंत गंभिर असून त्यामुळे रूग्णाच्या कुटूंबातील व्यक्तींना तसेच संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना याचा संसर्ग होऊन कोरोनाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे यापुढच्या काळात शहरात भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे त्वरित बेडची संख्या वाढवून पिंपरी चिंचवडकरांना दिलासा द्यावा अशी मागणी अक्षय घोडके यांनी केली आहे.