साक्षी गाडगे ठरली शाळेच्या इतिहासात पहिली शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१२/०१/२०२२

जुन्नर


बेल्हे

श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा (ता.जुन्नर) या विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी कांचन गाडगे हिने ८ वी च्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत १६२ गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून ती जिल्हा शिष्यवृत्ती साठी पात्र ठरली आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणारी विद्यालयाच्या इतिहासातील ती पहीली विद्यार्थिनी ठरली आहे.

या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालातील सर्व शिक्षक व पालकाचे अभिनंदन गावच्या सरपंच सविता तिकोने तसेच ग्रामस्थांनी केले आहे.

सदर परीक्षेसाठी साक्षीला विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग आंधळे,शिक्षक गाजरे झेड.पी.,रमेश मालुंजकर, जयश्री थोरात,माया माळवे,के. टी.जोरी,विजय घोलप यांनी मार्गदर्शन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *