बेल्ह्यात धोकादायक खड्डा : वाहनचालकांना करावा लागतोय सामना

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२४ जुलै २०२२

बेल्हे


बेल्हे (ता.जुन्नर) बायपास ते बसस्थानक रोडवरील शरद बँकेजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा धोकादायक बनत आहे.याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.गत वर्षी जुलै २०२१ मध्ये हा खड्डा गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी बुजवला होता. परंतु याठिकाणी वारंवार खड्डा पडत आहे. गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा खड्डा अधिकच मोठा व खोल झाला आहे.वाहनाला येण्या-जाण्यासाठी अडथळा होत असून मोठी कसरत करून वाहने चालवावे लागतात.तरी लवकरात खड्डा बुजवावा अशी विनंती वाहनधारकांनी केली आहे.

गतवर्षी या खड्यात एका दुचाकीचा अपघात होऊन महिलेला गंभीर दुखापत झाली होती. तर या खड्ड्यांमध्ये चार वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. गावातून जाणारा बेल्हे-जेजुरी महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या रस्त्यावर शाळकरी मुले व वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागत असल्याने सरपंच गोरक्षनाथ वाघ व ग्रामपंचायत तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायतीचे स्थानिक रहिवासी व प्रवाशांनी आभार मानले आहे. तसेच शरद बँकेजवळचा खड्डा बुजवावा अशी विनंतीही करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *