शिरूर शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

रवींद्र खुडे : विभागीय संपादक
शिरूर

 

शिरूर : शिरूर शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त शिरूर शहर अवघे जिजाऊमय व भगवे झालेले पाहायला मिळाले. राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती येथे अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गुरुवार दि. १२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी दहा वाजता जुन्या नगरपालिका येथे सकल मराठा समाज संघ, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ व इतरही संघटना, पक्ष तसेच अनेक नागरिकांनी अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे, शोभना पाचंगे, अवि जाधव, सागर नरवडे, साधना शितोळे, ज्योती कर्डीले, उर्मिला फलके, रवींद्र सानप, किरण पठारे, गणेश खोले, शामकांत वर्पे उपस्थित होते. स्वागत प्रा. सतीश धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले.

दुपारी अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजीत शिरूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सामील झाले होते. पारंपारिक वाद्य, भैरवनाथ झांज पथक, खंडाळे येथील शालेय मुलांचे लेझीम पथक, न्यू इंग्लिश स्कूल अण्णापूर यांचे लाठीकाठी पथक, शितोळे करिअर अकॅडमी, त्रिदल सैनिक संघटना, तसेच धैर्य सामाजिक संस्था कोथरूड येथील चिमुकल्यांनी केलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीत रंगत आणली.
या मिरवणुकीत माजी जी प सदस्या सुजाता पवार व शेखर पाचुंदकर, जाकीरखान पठाण, राजेंद्र थिटे, बापू शिंदे, शोभना पाचंगे, शैलजा दुर्गे, रवी काळे, रवींद्र धनक, गणेश शिंदे, संतोष मोरे, आबासाहेब सरोदे, विलास कर्डीले, कृष्णा घावटे, विठ्ठल घावटे, वर्षा काळे, नामदेव जाधव, किरण बनकर, सोमनाथ घावटे, बाबूराब पाचंगे, शरद कालेवार, शरद पवार, राम शेटे, गणेश जामदार, संजय काळे, संतोष शितोळे, मध्यकांत पानसरे यांसह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिरुरकर आवर्जून उपस्थित होते.

बालकलाकारांनी जो राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जिवंत देखावा सादर केला होता, त्यातील राजमाता जिजाऊ, बालशिवबा, मावळ्यांच्या वेशात सर्व सवंगडी व मिरवणुकीतील जिवंत देखावा हेच प्रमुख आकर्षण होते. रस्त्यावर फुलांच्या पायघड्या टाकत जिजाऊंचे स्वागत केले गेले. सर्वत्र लावलेले भगवे झेंडे व सर्वांच्या डोक्यावर असलेले भगवे फेटे यामुळे शिरूरमधील नगर – पुणे रोड भगवामय झाला होता. “तुमचे आमचे नाते काय ….जय जिजाऊ जय शिवराय…” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सायंकाळी मिरवणुकीचा समारोप इंदिरा गांधी पुतळ्याजवळ अर्चना भोर-करंडे यांच्या भारदार आवाजातील जिजाऊ यांचे जीवनावर अंगावर शहारे आणणारे व्याख्यान झाले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिमापूजन, सूत्रसंचालन यासह सर्व कार्यक्रम हे जिजाऊ लेकींच्या हस्ते पार पडला. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *