आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेशशेठ काळे यांची निवड…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेशशेठ भिमाजीशेठ काळे यांची तर  कार्याध्यक्षपदी  शिवाजीराव गोविंदराव घोडेकर, तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन पदी अजितशेठ दत्तात्रय काळे, खजिनदारपदी शिवदासशेठ मधुकर काळे, यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन अजितशेठ काळे ,आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष  तुकाराम  काळे, बी.डी काळे महाविद्यालयचे चेअरमन ॲड संजय आर्वीकर, संचालक श्री विश्वासराव काळे ,यांच्या हस्ते करण्यात आला.


या प्रसंगी संस्थेचे सचिव ॲड मुकुंदराव काळे ,समन्वय समितीचे चेअरमन संतोष भास्कर ,भागशाळा सालचे चेअरमन सोपानराव काळे ,मुक्ताई प्रशालेचे चेअरमन जितेंद्र जोशी, बि.डी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य आय.बी जाधव सर, जनता विद्या मंदिर जूनियर कॉलेजच्या प्राचार्य खेडकर मॅडम ,मुक्ताई प्रशालेचे मुख्याध्यापक मुळे सर व इतर मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वय समितीचे चेअरमन श्री संतोष पुरुषोत्तम भास्कर यांनी केले.

या वेळी सर्व निवड झालेल्या नवनिर्वाचित  पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कैलास बुवा काळे मित्र मंडळ , देवेंद्रशेठ शाह फाऊँडेशन , घोडेगाव व पंचक्रोशितील नागरिकांनी या निवडीचे स्वागत करुन अभिनंदनाचा वर्षाव केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *