राष्ट्रीय पातळीवरील कॉंक्रिट क्युब स्पर्धेत जयहिंदचा संकेत डोकेचा प्रथम

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पार पडलेल्या राष्ट्रिय कॉंक्रिट क्युब स्पर्धेत कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत डोके याला प्रथम पारितोषिक मिळाले. दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. स्थापत्य अभियांत्रिकीच्या १२०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

संकेत याने या स्पर्धेसाठी एम-४० ग्रेडचे कॉंक्रिट मिक्स डिजाईन तयार केले होते. या कॉंक्रिट मिक्स डिजाईन साठी त्याला प्रा. एस. एम. नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले. संकेत याला रोख २१ हजार रू चे पारितोषिक देण्यात आले, अशी माहिती जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी दिली. संकेतच्या या यशाबद्दल जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डि.एस.गल्हे यांनी अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *